नवी दिल्ली : राज्यसभेतील भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे भ्रष्टाचारांच्या आरोपांवरुन विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी परिचित आहेत. आता तर त्यांनी थेट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरच निशाणा साधला आहे.


 

रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाचं नुकसान झालं आहे, त्यामुळं रघुराम राजन यांनी शक्य तेवढ्या लवकर देश सोडून शिकागोला जावं, असं वक्तव्य स्वामी यांनी केलं आहे.

 

राजन यांचं धोरण देशाच्या अर्थव्यवस्थेला अनुकूल नाही. बँकेने वाढवलेल्या व्याजदरांमुळेच उद्योग तोट्यात गेले असल्याचं स्वामी यांचा आरोप आहे.

 

राजन यांनी 5 सप्टेंबर 2013 साली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली होती. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपणार आहे.