S. Jaishankar On George Soros: पंतप्रधान मोदींवर (Pm Modi) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस (George Soros) यांच्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी टीका केली आहे. सोरोस न्यूयॉर्कमधील ज्येष्ठ, श्रीमंत आणि धोकादायक व्यक्ती आहे. आपल्या मताप्रमाणे संपूर्ण जगाचे काम चालावे असे त्यांना वाटते अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्यावर हल्ला केला आहे.


 अदानी- हिंडनबर्ग प्रकरणाबद्दल मोदी शांत आहेत. पण त्यांना परकीय गुंतवणूकदारांकडून आणि संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यावर जयशंकर यांनी सोरोस यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, आपल्या आवडीच्या व्यक्तीने निवडणूक जिंकावी असे मतदाराला वाटते. परंतु त्याच्या आवडीचा उमेदवार निवडून आला नाही तर ते मतदार निकालावर, उमेदवारावर आणि सत्ताधारी पक्षावर टीका करतात. पण निकाल काही वेगळा आला तर त्यांना देशाच्या लोकशाहीत उणीवा दिसतात. जगाने आपल्या हिशोबाने चालावे असे त्यांना वाटते. 






काय म्हणाले सोरोस?


भारत हा एक लोकशाहीचा आदर करणारा देश आहे. मात्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मानणारे नाहीत. उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळचे सहकारी आहेत. अदानी यांच्यावर शेअर बाजारात गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. या विषयावर मोदी शांत आहेत. पण त्यांना परकीय गुंतवणूकदारांकडून आणि संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तसेच मुस्लिम समाजाविरोधात चिथावणी देणं हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक भाग आहे, असे सोरोस म्हणाले.  


कोण आहेत जॉर्ज सोरोस?


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 254 व्या क्रमांकावर आहेत. सोरोस यांची वैयक्तिक संपत्ती 8.5 डॉलर अब्ज आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी केली. त्यानंतर 1956 साली सोरोस न्यूयॉर्कला गेले. न्यूयॉर्कमध्ये वॉल स्ट्रीट येथे त्यांनी अनेक पदावर काम केले. त्यानंतर 1660 साली त्यांनी क्वांटम फंडची स्थापना केली. आपल्या भारतविरोधी दृष्टीकोनाबद्धल ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वीच्या त्यांच्या अनेक वक्तव्यातून त्यांचा भारतविरोधी दृष्टीकोन जगजाहीर झाला आहे.