Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनधील युद्धाचा आजचा दुसरा दिवस आहे. दोन दिवसांत दोन्ही देशाचे मोठे नुकसान झाले. शिवाय या दोन्ही देशांतील वाढत्या तणावाचा जगभरातील इतर देशावरही मोठा परिमाण झाला आहे. जगभरात या युद्धामुळे तणावाचं वातावरण असलं तरीही नेटकरी काही मीम्स बनवण्यापासून राहत नाही, आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युक्रेनच्या सैनिकांनी शरणागती पत्करली तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, या सध्याच्या परिस्थितीत अनेक मजेशीर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत.






 






 






नोव्हेंबरपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. आता रशिया-युक्रेन सीमेवर युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पण दुसरीकडे मात्र या सर्व गोष्टींवर नेटकरी मिम्स तयार करताना दिसत आहेत. काही यूझर्सनं सोशल मीडियावर मिम्स शेअर करून त्यांची मतं भन्नाट पद्धतीनं मांडली आहेत. 


 







सध्या रशिया-युक्रेन सीमेवर (Russia-Ukraine Conflict) मोठा तणाव आहे. रशिया-युक्रेनमधल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या नागरिकांची चिंता आहे. त्यासाठीच भारताने मिशन AIRLIFT सुरू करणार  आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दोन विमान पाठवणार आहे. 


 






 


आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युक्रेनच्या सैनिकांनी शरणागती पत्करली तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं वक्तव्य लावरोव यांनी केलं आहे. "रशियाला युक्रेन 'अत्याचारापासून मुक्त' हवा आहे. युक्रेन अत्याचारापासून मुक्त झाला तर युक्रेनियन लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतील. अशा परिस्थितीत रशिया गप्प बसू शकत नाही. युक्रेनच्या सरकारला लोकशाही सरकार मानण्याची कोणतीही संधी आम्हाला सध्या दिसत नाही, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री लावरोव यांनी केले आहे.  


 






रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आता तिथली परिस्थिती अधिकच भयावह होत आहे. अशा स्थितीत युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून भारतीयांसाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली असून सीमा भागाजवळ असलेल्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील जवळपास 100 हून जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्य प्रशासनाकडून परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.


 







मराठवाड्यातील 61 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती आहे. यामध्ये औरंगाबाद 3 , जालना 7, नांदेड 20 ,परभणी 4 , लातूर 21, उस्मानाबाद मधील 6 विद्यार्थांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिलीय. हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिलीय.


 






 


दरम्यान रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये व्यवसायाच्या निमित्त गेलेल्या आणि तिकडे अडकलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थी आणि नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यात नातेवाईक, पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे. काही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तर काही नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त युक्रेनमध्ये आहेत..