नवी दिल्ली : सोशल मीडियावर देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या अफवा पुन्हा एकदा पसरली आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे मेसेज आज दिवसभर व्हायरल होत आहेत.
भाजपकडूनही यावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
वास्तविक, अटलजींच्या निधनाची अफवा कालपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक या बातम्या खऱ्या असल्याचे समजून अटलजींना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. तसेच याबाबचे मेसेज पुढे फॉरवर्ड करत आहेत.
अटल बिहारी वाजपेयी डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. 2004 पासून ते राजकारणापासून दूरच आहेत. 2009 पासून ते व्हिलचेअरवर आहेत भारत सरकारने त्यांना 2014 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवलं.
सोशल मीडियावर अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाची अफवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Mar 2018 05:40 PM (IST)
सोशल मीडियावर देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या अफवा पुन्हा एकदा पसरली आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे मेसेज आज दिवसभर व्हायरल होत आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -