पाकच्या ISI साठी हेरगिरी करणारा एकजण अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2018 01:06 PM (IST)
पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे. राज्य विशेष अभियान सेल (एसएसओसी) आणि भारतीय लष्कराच्या गुप्तहेर संस्थेने ही कारवाई केली. रवि कुमार असं या व्यक्तीचं नाव असून, पोलीस निरीक्षक गुररिंगदल पाल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडून महत्त्वाची कागदपत्रं, काही स्केचेस, लष्करीतळाची माहिती देणारे फोटो आदी साहित्य जप्त केलं आहे. रवि कुमार सात महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याशी फेसबुकद्वारे संपर्कात आला. यानंतर, त्याने पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करण्या सुरुवात केली.