ड्रोनची पाच भागात विभागणी
DGCA ने ड्रोनची पाच भागात विभागणी केली आहे. पहिला म्हणजे नॅनो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ग्रॅम असते. दुसरे आहे मायक्रो ड्रोन ज्याचे वजन अडीचशे ते 2 किलो पर्यंत असतं. तर बाकी 3 लहान,मध्यम, आणि मोठ्या साईजचे असतात. ज्यांचे वजन 2 किलो ते 150 किलो पर्यंत असतात.
ड्रोन उडवण्यासाठीचे नियम
- भारतात आता 1 डिसेंबरपासून ड्रोनच्या उड्डाणावरील प्रतिबंध हटवण्यात आले आहे. मात्र त्यासाठी DGCA कडे काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. ड्रोनसाठी युनिक आयडेंटीफिकेशन नंबरची गरज लागणार आहे. त्यासाठी एअरक्राफ्ट ऑपरेटर परवाना घ्यावा लागेल.
- जर तुमच्याकडे ड्रोन आहे, तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम DGCA ची परवानगी अवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही ड्रोन उडवू शकणार नाही.
- तुमच्याकडे मायक्रो ड्रोन आहे आणि ते तुम्हाला 200 फुटांच्या खाली उडवायचे असेल, तर 24 तासापूर्वी त्याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार. जर ड्रोन सरकारी एजन्सीचा असेल तर उडवण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्थानकाला त्याची सूचना द्यावी लागणार.
- ड्रोन ऑपरेटरने वयाची किमान 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत
- ड्रोन ऑपरेटरने इंग्रजी हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण केलेलं असावं. ड्रोन ऑपरेटिंगसाठी ट्रेनिंग प्राप्त केलेलं असावं
- या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्यालाच DGCA कडून परवाना देण्यात येईल. ज्यासाठी कागदाची पुर्तता करावी लागेल. डीजीसीएच्या परवान्याची वैधता पाच वर्षांची असेल, दर पाच वर्षांनी या परवान्याचं नूतनीकरण करणं अनिवार्य असेल
- ड्रोनचा विमा उतरवलेला असावा. तसेच DGCAने ड्रोन उडवण्यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. त्यावेळेतच ड्रोन उडवावे लागेल.
- दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु या शहरांतील विमानतळाच्या पाच किलोमीटरच्या परिघात ड्रोन उडवता येणार नाही. इतर शहरातील विमानतळाच्या परिसरात 3 किमी आत प्रतिबंध असणार आहे.
- अंतरराष्ट्रीय सीमेच्या 25 किमी जवळ ड्रोन उडवण्यास प्रतिबंध असेल.