Omicron Variant : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या तपासणी नाक्यावर थोडी शिथिलता आली होती. पण दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमिक्रोन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्यानंतर सर्वांनी सावध पवित्रा घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतून बंगळूरूला आलेल्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कर्नाटक सरकारने अधिक सावध पावलं उचलत आपल्या सीमेवरील तपसणी पुन्हा एकदा कठोर केली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक येथून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. 


कोरोनाचा ओमिक्रोन व्हेरिएंट आढळल्यानंतर तसेच धारवाड येथील वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्नाटक सरकारने कठोर पावले उचलली आहेत. महाराष्ट्र आणि केरळ येथून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी बंधनकारक आर करण्यात आली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील बाची येथे रविवारी सकाळपासून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी नाही, त्यांना परत पाठवण्यात येत आहे. 


आफ्रिकेतून आलेल्या दोन नागरिकात देखील नवे व्हेरीएंट आढळून आल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी  तातडीची बैठक घेवून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी आर टी पी सी आर निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे सक्तीचे केले. राज्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर तीन शिफ्टमध्ये महसूल, आरोग्य आणि पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. रविवारी सकाळपासून गोवा, महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग येथून येणाऱ्या प्रवाशांची कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी बाची येथे आर टी पी सी आर निगेटिव्ह सर्टिफिकेट तपासूनच प्रवेश देण्यात येत आहे. RT-PCR चाचणी प्रपाणपत्र नसणाऱ्या प्रवाशांना सीमेवरून परत पाठवण्यात आले.


महाराष्ट्र,गोवा आणि सिंधुदुर्ग येथून येणाऱ्या सगळ्या वाहनांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून मगच प्रवेश दिला जात आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील बाची येथे आरोग्य,महसूल आणि पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांना तीन शिफ्ट मध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून रॅपिड अँटीजेन टेस्ट सीमेवर आरोग्य खात्याचे कर्मचारी करत आहेत.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live