गाजीपूर : उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये संघ स्वयंसेवक आणि स्थानिक पत्रकार राजेश मिश्राची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन अज्ञात बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
राजेश मिश्रा ब्रह्मणपूरा गावातील एका दुकानाजवळून जात होते. तेव्हा दोन अज्ञात बाईकस्वारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यावेळी राजेश मिश्रा यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा लहान भाऊ अमितेश मिश्रा (वय 30) हा देखील जखमी झाला. त्याला वाराणसीमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्याची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टारांनी दिली.
संघ स्वयंसेवकाच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. हत्येच्या घटनेनंतर कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी फिरकला नसल्याचे मिश्रा यांचे भाऊ गप्पू मिश्रा यांनी सांगितलं.
कोण आहे राजेश मिश्रा?
राजेश मिश्रा उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमधील ब्राह्मणपूरा परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालुका कार्यवाह म्हणून जबाबदारी आहे. शिवाय एका स्थानिक दैनिकासाठी ते पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या दैनिकामधून स्थानिक खाण माफियाविरोधात लेखमाला प्रसिद्ध केली होती. त्यामुळे ती लेखमाला थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता.
दरम्यान, चारच दिवसांपूर्वी पंजाबमधील लुधियानामध्येही संघाच्या स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या घटनेतही अज्ञात बाईकस्वाराने रवींद्र गोसाई या 60 वर्षीय स्वयंसेवकाची हत्या केली. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उत्तर प्रदेशमध्ये संघ स्वयंसेवकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2017 04:59 PM (IST)
उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये संघ स्वयंसेवक आणि स्थानिक पत्रकार राजेश मिश्राची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -