पत्रात लिहिलं आहे की, संघाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर भारतमातेची प्रतिमा असते. परंतु भारतमातेचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या महिला कार्यक्रमात कधीच कार्यरत नसतात. राष्ट्र सेविका समिनती ही जरी महिलांची विंग असली तरी ती नाममात्र आहे. या समितीने महिलांसाठी कधीच आक्रमक, भरीव काम केलेलं नाही.
संघात महिलांचा समावेश झाला, तर आरएसएससारख्या मोठ्या संघटनेकडून समानतेचा संदेश जाईल, असं मत तृप्ती देसाईंनी पत्रात व्यक्त केलं आहे. केंद्र आणि राज्यात संघप्रणित सरकार असल्याने याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असं देसाईंनी पत्रात म्हटलं आहे. तसंच या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तृप्ची देसाईंनी मोहन भागवत यांच्याकडे भेटीची वेळही मागितली आहे.