कृषिमंत्री राधामोहन सिंग रात्री 11 वाजता महिला खासदाराला मेसेज करतात, असं पवारांनी राज्यसभेत सांगितलं. तुम्हाला कामाबाबत आदर आहे आणि महिलांचा सन्मान करता, ही चांगली गोष्ट आहे, अशी तिरकस टीकाही त्यांनी केली. विशेष म्हणजे ही चर्चा सुरु असताना पवारांनी हे दोन वेळा सांगून राधामोहन यांना डिवचलं.
पवारांच्या वक्तव्यानंतर राज्यसभेत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली. मात्र राधामोहन यांनी लगेच स्पष्टीकरण देऊन आपली बाजू स्पष्ट केली. महिला खासदाराने मला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी दुष्काळाबाबत मेसेज केला होता, तो थोड्या वेळानंतर वाचला, तरी रिप्लाय तातडीने केला होता, तेव्हा 11 वाजले होते, मात्र हा रिप्लाय करताना तो खासदार महिला की पुरुष हे मी पाहिलं नाही, असं स्पष्टीकरण राधामोहन यांनी दिलं.
भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाच्या पिकाला विरोध होत असताना ‘ऊसाचं पिक कुणी टाटा-बिर्ला घेत नाही तर शेतकरीच घेतो’,असं म्हणत माजी कृषीमंत्री शरद पवारांनी मात्र राज्यसभेत ऊस उत्पादकांची जोरदार पाठराखण केली.
राज्यसभेत दुष्काळावर चर्चा सुरु असताना उसाच्या पिकाचा विषय निघाला. त्यावेळी ऊसाचं पिक कुणी टाटा-बिर्ला घेत नाही तर शेतकरीच घेतो अशा शब्दात पवारांनी ऊसाच्या पिकाचं समर्थन केलं. तसंच ऊस जास्त पाणी पितो असं मला वाटत नाही, असंही पवार राज्यसभेत
म्हणाले.