हेडलाईन्स


हाजी अली दर्गा प्रवेश वाद: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

 

राज्य सरकार 'नीट'विरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार

 

हाजी अली दर्गा प्रवेश वाद : तृप्ती देसाई मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना, मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार

 

AIPMT ची परीक्षा NEET नावाने होणार, पहिली परीक्षा 1 मे, दुसरी परीक्षा 24 जुलै रोजी,17 ऑगस्टला निकाल,मेडिकल प्रवेशावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय

------------------------

#पुणे : 'आपलं घर' योजना फसवणूक प्रकरण, सचिन अग्रवालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

-----------------------

मुंबई : फोर्ट इथल्या हरिश चेंबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना

-----------------------------

1. साताऱ्यात भुईंज परिसरात बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला, 3 मजूरांना बाहेर काढण्यात यश, काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता, बचावकार्य सुरु

 

2. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत लाचखोरी, इटालियन कोर्टाचा ठपका, सोनिया गांधींना कोट्यवधींची लाच मिळाल्याचा भाजपचा आरोप

 

3. ऊसाचं पिक टाटा-बिर्ला घेत नाहीत, दुष्काळाच्या चर्चेत शरद पवारांची उसासाठी बॅटिंग, तर देश काँग्रेसमुक्त आधी दुष्काळमुक्त करा, शिवसेनेचा सल्ला

 

4. राज्यात लातूर, नांदेड, बीडमध्ये अवकाळी पावसाचा फटका, उन्हाच्या काहिलीत वातावरणात गारवा, लातूरमध्ये बागायती पिकांचं मोठ नुकसान

 

5. संघात महिलांनाही समान संधी द्या, तृप्ती देसाईंचं मोहन भागवतांना पत्र, तर हाजीअलीच्या आंदोलनासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 

6. बहुतांश काम अपुरी असताना आज पुणे पालिकेकडून बीआरटी प्रकल्पाचं उद्घाटन, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटन करत असल्याचा नागरिकांचा आरोप

 

7. अखेर आयपीएल महाराष्ट्रातून हद्दपार, बीसीसीआयची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, वेळापत्रक बदलण्याची नामुष्की

 

8. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या इतिहासाच्या पुस्तकातील घोडचूक, देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद भगतसिंहांचा 'क्रांतीकारी दहशतवादी' म्हणून उल्लेख

 

9. कराची विमानतळावर पाकिस्तानच्या असहिष्णुतेचं दर्शन, दिग्दर्शक कबीर खान यांच्याशी असभ्य वर्तन, पाकविरोधी चित्रपट बनवल्याने आक्षेप

 

एबीपी माझा वेब टीम