Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय. तसेच देशातील गरिबी आणि बेरोजगारीवरही त्यांनी भाष्य केलं. देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी असून असमानताही वाढत आहे. देशातील 20 कोटी लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत. एवढेच नाही तर देशातील 23 कोटी लोकांचं रोजचं उत्पन्न 375 रुपयांपेक्षा कमी आहे.  देशाच्या मोठ्या भागांना अजूनही शुद्ध पाणी आणि पोषक आहार मिळत नाही. आपण या राक्षसाचा वध करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.


देशातील चार कोटी लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. लेबर फोर्स सर्व्हेनुसार देशातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे. तसेच देशातील आर्थिक असमानताही सर्वात मोठा मुद्दा आहे. भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पण परिस्थिती चांगली आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 


देशातील 23 कोटी लोकांचा रोजगार 375 रुपयांपेक्षा कमी
"देशातील 20 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. तब्बल  23 कोटी लोक प्रतिदिन 375 रुपयांपेक्षा कमी कमावतात. देशातील गरिबी आपल्यासमोर राक्षसारखी आहे. या राक्षसाचा नायनाट करणे महत्त्वाचं आहे." अर्थव्यवस्थेतील अपयशासाठी दत्तात्रय होसबळे मागच्या सरकारांच्या सदोष आर्थिक धोरणांना जबाबदार धरलंय.


ग्रामीण भागात 2.2 कोटी लोक बेरोजगार
"देशातील चार कोटी लोक बेरोजगार आहेत. यातील ग्रामीण भागातील संख्या 2.2 कोटी आहे. तर, शहरात 1.8 कोटी बेरोजगारीचा सामना करतायेत. कामगार सर्वेक्षणात आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे.  रोजगार निर्मितीसाठी आपल्याला केवळ अखिल भारतीय योजनाच नव्हे तर स्थानिक योजनांचीही निर्मितींची गरज आहे", असंही होसबळे यांनी म्हटलंय.


कौशल्य विकास क्षेत्रात पुढाकार घेण्याची सूचना
कुटीर उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आकर्षण वाढवण्यासाठी कौशल्य विकास क्षेत्रात अधिक पुढाकार घेण्याचा होसबळे यांनी सूचना केलीय. भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं आकडेवारी सांगते. पण देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश (20 टक्के) आहे. तर, 50 टक्के जनतेचं उत्पन्न हे केवळ 13 टक्के आहे. ही चांगली स्थिती आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीची आवश्यकता
ग्रामीण भागातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत दत्तात्रय होसबळे म्हणाले की, "ग्रामीण भागात रोजगार निमिर्ती करण्याची आवश्यकत असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच उद्देशानं स्वदेशी जागरण मंचनं 'स्वावलंबी भारत अभियान सुरु केलंय. या मोहिमेंतर्गत एसजेएम ग्रामीण स्तरावर कौशल्य विकास आणि मार्केटिंगसह कृषी आणि संबंधित क्षेत्रात नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल", असंही त्यांनी म्हटलंय.


हे देखील वाचा-