Continues below advertisement


बंगळुरू: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या भूमिकेबाबत आणि सदस्यत्वाबाबत महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. बंगळुरूमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की संघ कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नसून फक्त नीती (Policy) आणि राष्ट्रीय हित (National Interest) यांना पाठिंबा देतो. तसेच RSS मध्ये प्रवेशासाठी धर्मावर आधारित मुस्लिम किंवा ख्रिश्चनांसाठी कोणतीही अडथळा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘संघ राजकारण करत नाही’ (RSS On Electoral Politics)


मोहन भागवत म्हणाले की, "RSS निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होत नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने उभा राहत नाही. संघ नेहमी त्या नीतीचे समर्थन करतो ज्या देशहिताच्या दिशेने जातात. राम मंदिराच्या समर्थनात ज्या पक्षांनी भूमिका घेतली, स्वयंसेवक त्यांच्याकडे गेले. जर काँग्रेसनेही तशी भूमिका घेतली असती, तर स्वयंसेवक काँग्रेसलाही मत दिले असते.”


मुस्लिमख्रिश्चनही संघात येऊ शकतात (Minority Participation In RSS)


मुस्लिमांचे संघात स्वागत आहे का या प्रश्नावर भागवत यांनी स्पष्ट उत्तर दिले. त्यांनी सांगितले की संघात जातधर्माचा प्रश्नच नाही. जो कोणी संघात येतो, त्याने भारत माता हाच आपला धर्म मानावा. शाखेत मुस्लिम आणि ख्रिश्चन दोघेही येतात, पण आम्ही कुणाचा धर्म विचारत नाही.


संघाचे रजिस्ट्रेशन नसण्याचे कारण (Why RSS Is Not Registered)


काँग्रेसकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, संघाचा रजिस्ट्रेशन नसणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे नाही.1925 मध्ये ब्रिटिशांच्या काळात संघाचे रजिस्ट्रेशन करणे शक्य नव्हते आणि आजही कायद्यानुसार रजिस्ट्रेशन बंधनकारक नाही. सरकारने तीन वेळा बंदी घातली, याचा अर्थ ती संघाला मान्यताप्राप्त संस्था मानते, असे भागवत यांनी स्पष्ट केले.


काँग्रेसवर पलटवार (Response To Congress Criticism)


मल्लिकार्जुन खरगे यांच्या 'RSS वर बंदी हवी' या वक्तव्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले की, विरोध वाढला की संघ अधिक सक्षम होतो. अलीकडे काँग्रेस नेत्यांनी केलेल्या हल्ल्यांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले.


तिरंगा आणि भगवा ध्वज वाद (Tricolor And RSS Flag Issue)


काँग्रेसच्या आरोपांवर बोलताना भागवत म्हणाले की, RSS नेहमी तिरंग्याचा सन्मान करतो. आमचा भगवा ध्वज 1925 मध्ये स्वीकारला. राष्ट्रीय ध्वज 1933 मध्ये ठरला. त्या वेळी ध्वज समितीनेही भगव्या रंगाचा विचार केला होता. देशाचा तिरंगा सर्वात श्रेष्ठ असून त्याचा आम्ही नेहमीच सन्मान केला आहे.



ही बातमी वाचा: