जयपूर/ राजस्थान : जयपूरमध्ये 2 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने स्वत: ला पेटवून घेतलं. भारत बंदमुळे त्रस्त होऊन त्याने हे पाऊल उचलल्याचा दावा संघ कार्यकर्त्याच्या मित्रांनी केला आहे.


रघुवीर शरण अग्रवाल असं या संघ कार्यकर्त्याचं नाव असून, त्याने 2 एप्रिल रोजी घराजवळच्या पेट्रोल पंपावर स्वत: वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यानंतर ‘भारत माता की जय’चे नारे देत, जवळपास 100 मीटरपर्यंत तो धावत सुटला. या घटनेत रघुवीर 80 टक्के भाजपला असून, डॉक्टरांनी त्याला दिल्लीत हलवण्याचा सल्ला दिला आहे.

प्रत्यक्षदर्शी अशोक कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, आत्मदहन केलेला व्यक्ती भारत माता की जयचे नारे देत होता. तर आसपासचे लोक त्याच्यावर पाणी टाकून आग विजवण्याचा प्रयत्न करत होते.

रघुवीर शरणने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की, “समाजात वाढता जातीय द्वेषाने त्रस्त होऊन आपण आत्मदहनाचे पाऊल उचलले.”