राहुल गांधी म्हणाले की, ''काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी देशातील जनतेवर एक विचारधारा थोपवू पाहात आहेत. त्यांचे हे मनसूबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही.''
''आम्ही देशातील अब्जावधी जनतेचा आवाज दाबू देणार नाही. जेव्हा ते आपले हस्यास्पद विचारांचा प्रसार करतील. तेव्हा आम्ही मुकपणानं उभे राहून ते पाहणार नाही,'' असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त विरोधकांची एकजूट पुन्हा पाहायला मिळाली. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीला विरोधक याच एक जुटीने सामोर जातील, असे संकेत यावेळी देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, कम्यूनिस्ट पक्षाचे डी. राजा, सीताराम येच्यूरी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पण आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थीत नव्हते.