मुंबई : जीएसटी परिषदेनं सिगारेटवर सेस लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. याचाच परिणाम म्हणजे एलआयसीचं तब्बल सात हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

जीएसटी परिषदेच्या या निर्णयानंतर तंबाखू कंपनी आयटीसी अर्थात इंडिया टोबॅको कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. या घसरणीचा थेट फटका आयटीसीमधील सर्वात मोठी भागधारक असलेल्या एलआयसीला बसला आहे. पहिल्या अर्ध्या तासामध्येच एलआयसीचं सात हजार कोटींचं नुकसान झालं आहे.

शेअरमध्ये झालेली 15 टक्क्यांची घसरण ही आयटीसीच्या शेअरमध्ये 1992 नंतरची सर्वात मोठी घसरण असल्याचं सांगितलं जात आहे. आयटीसीमध्ये एलआयसीचे सर्वाधिक शेअर आहेत. 31 मार्च 2017 च्या आकडेवारीनुसार आयटीसीमध्ये एलआयसीचे 16.29 टक्के समभाग आहेत.