नवी दिल्ली : मंगळवारी राज्यसभेच्या सत्रात काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांना निरोप देण्यात आला. त्यांच्याव्यतिरिक्त आज शमशेर सिंग, मोहम्मद फयाज, नाजिर अहमद या चार सदस्याना निरोप देण्यात आला. हे चारही सदस्य जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व करतात.


दरम्यान, आझाद यांचा निरोपसमारंभ आणि राज्यसभेतील मंगळवारचा दिवस बऱ्याच अंशी खास राहिला. आझादांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या या दिवशी एकिकडे कुठे भावना दाटून आल्याचं पाहायला मिळालं, तर कुठे एकच हशा पिकल्याचंही दिसून आलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याशी राजकीय विश्वात असणारं त्यांचं नातं आणि त्यापलीकडेही असणारी मैत्री शब्दांत व्यक्त केली. राज्यसभेत बोलत असतानाच पंतप्रधानांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते हुंदका देऊन रडले. पंतप्रधानांचं मनोगत ऐकून आझाद यांच्या निरोपसमारंभासमयी सारं सभागृह भावूक झालं.


PM Modi's Emotional Speech in RS : राज्यसभेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर, म्हणाले...


आठवलेंमुळं राज्यसभेत हास्यजत्रा...


राज्यसभेच्या सदनातील वातावरण काहीसं भावूक झालेलं असतानाच रिपाईचे रामदास आठवले उभे राहिले आणि त्यांनी कविता सादर करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत लिहिण्यात आलेली ही कविता आठवलेंनी त्यांच्याच शैलीत सादर करण्यात सुरुवात केली आणि उपस्थित सर्वच सदस्यांच्या चेहऱ्यांवर हसू आलं. राज्यसभेतील सर्वच सदस्यांसह खुद्द गुलाम नबी आझाद यांनाही आठवलेंच्या या काव्यशैलीनं हसू आवरता आलं नाही.


आझादांसाठी आठवलेंनी लिहिलेल्या या कवितेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हापुन्हा या सदनात यावं अशी इच्छा आठवलेंनी व्यक्त केलं. बरं, यावेळी एक रंजक प्रस्तावही त्यांनी गुलाम नबी आझादांपुढं ठेवला. जर काँग्रेस तुम्हाला इथं (राज्यसभेत) घेऊ इच्छित नाही, तर आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्यावर राज्यसभेच एकच हशा पिकला. पंतप्रधन नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही हसू आवरता आलं नाही. सोशल मीडियायवर आणि राजकीय वर्तुळात आठवलेंची ही कविता सध्या बरीच गाजत आहे.





कवितेच्या माध्यमातून आठवले म्हणाले...


राज्य सभा छोड़कर जा रहे गुलाम नबी
राज्य सभा छोड़कर जा रहे गुलाम नबी


हम मिलते रहेंगे आपको कभी कभी
आपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूँ आपको सलाम,


आपका नाम है गुलाम, लेकिन आप हमेशा रहे आजाद
आप हम सभी को रहेंगे याद,


15 अगस्त को देश हुआ आजाद, लेकिन राज्य सभा से आप आज हो रहे आजाद...
आप हमेशा रहो आजाद, हम रहेंगे आपके साथ, ये अंदर की है बात,
मोदी जी जम्मू-कश्मीर का मजबूत करेंगे हाथ और आपका देते रहेंगे साथ.