शंकराप्रमाणे कमरेवर वाघाच्या कातडीचं कापड, गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ आणि डमरु घेऊन तेजप्रताप शिवभक्त आणि कार्यकर्त्यांसह मंदिरात गेले. तिथे त्यांनी शंखही वाजवला. मंदिरातील पूजेनंतर ते बाबाधामला रवाना झाले.
बिहार-झारखंडमधील अनेक भक्त देवघरच्या बाबा वैद्यनाथ धामला जाऊन शंकरावर जलाभिषेक करतात. तेजप्रताप कावड घेऊन सुल्तानगंजहून 120 किमी पायी देवघर जातील.
तेजप्रताप पहिल्यांदाच त्यांच्या भक्तीमुळे चर्चेत आलेत असं नाही. यापूर्वी त्यांनी श्रीकृष्णाचं रुप धारण केलं होतं.