जिमनॅस्ट दीपा कर्माकरवर ट्वीट करणाऱ्या तरूणीला धमकी
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 10:20 AM (IST)
नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरबद्दल ट्वीट करणाऱ्या एका तरुणीला धमकी मिळाली आहे. तरूणीला धमकी मिळाल्यानंतर तिने सायबर सेलमध्ये तक्रार केली आहे दीपा कर्माकर प्रुडोनोवा हा अतिशय कठीण जिम्नॅस्टिक्सचा प्रकार करते. "प्रुडोनोवा करून या फालतू देशासाठी आपला जीव धोक्यात का घालते आहेस?" असा सवालच या तरूणीने दीपाला ट्विटरवर विचारला आहे. या ट्विटनंतर तिला धमक्या येण्यास सुरूवात झाली आहे. दीपाबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या जयपूरमधील या तरूणीला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तिला धमकी देणाऱ्यांचा आयपी अड्रेसच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी वसुंधरा राजे यांना याप्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर आरोपींना शोधण्याची सुचना केली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये काही पॉँईट्सच्या फरकाने दीपा पदक मिळवू शकली नाही. दीपा अंतिम फेरीत पोहोचणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे.पदक न मिळताही संपूर्ण देशाने दीपाचे कौतुक केलं आहे.