मुंबई : रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअर पर्सन आणि फाऊंडर नीता अंबानी यांनी आज पहिल्यांदा रिलायन्स इंडस्ट्रीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबेधित केलं. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसविरोधात सुरु असलेल्या लढ्याची माहिती सर्वांनी दिली. या लढाईत रिलायन्स फाऊंडेशन कसं काम करतंय याबाबतही त्यांनी सांगितलं.


नीता अंबानी यांनी म्हटलं की, कोरोना महामारीविरोधातील लढाई अजून बाकी आहे. रिलायन्स फाऊंडेशन या लढ्यात सरकार आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा यांच्यासोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स फाऊंडेशन कोरोना टेस्टिंगच्या दिशेने वेगाने काम करत आहे. या कामात जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे.


आम्ही लोकांना विश्वासाने सांगतो की, ज्यावेळी कोरोना व्हायरसवर लस येईल, तेव्हा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीने देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं नीता अंबानी यांनी सांगितलं.


रिलायंन्स इंडस्ट्री लिमिटेडचा मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. मुकेश अंबानी यांनी गुगलबरोबर झालेल्या कराराचीही माहिती दिली. जियोमध्ये गुगल 7.7 टक्के समभाग गुंतवणूक करणार आहे. म्हणजेच जियोमध्ये गूगल 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या




Jio 5G solution | जिओ 5G नावाची जादू आहे तरी काय?