LIVE UPDATES | परंपरेनुसार माऊलींच्या पादुका गाभाऱ्यात विराजमान झाल्या

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु आहे. मुकेश अंबानी यांनी या बैठकीत मोठ्या घोषणा केल्या आहेत. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं 5G तंत्रज्ञान लवकरच ट्रायल सुरु करणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी या बैठकीत बोलताना सांगितलं. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2020 08:27 PM
#BreakingNews
बारावीचा निकाल उद्या (16 जुलै) जाहीर होणार, उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गाभाऱ्यात विराजमान झाल्या. परंपरेनुसार दशमी दिवशीची ही प्रथा टाळ-मृदुगाच्या गजरात पार पडली. 13 जूनला माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान झालं होतं, मात्र लॉकडाऊनमुळं त्या आळंदीतच मुक्कामी होत्या. त्यांनतर दशमीला इतिहासात पहिल्यांदाच माऊलींच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटीतून पंढरीला गेल्या. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात द्वादशीला भेट ही झाली आणि परंपरा पार पडली. मात्र यंदा त्याच दिवशी पादुकांच्या परतीचा प्रवास झाला. तेंव्हा पासून माऊलींच्या पादुका आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात मुक्कामी होत्या. मग आज दशमी दिवशी परंपरेनुसार पादुका गाभाऱ्यात दाखल विराजमान झाल्या.
परभणीत संचारबंदी 17 जुलैपर्यंत वाढवली, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी यांचा निर्णय, 17 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व बंद असणार, केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा
लातूर शहर आणि परिसरात मागील एक तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे ..आज दुपार पासून जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण होते दुपार नंतर पावसाला सुरुवात झाली आहे ..जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने ओढ घेतली होती यामुळे जोमातील पिकांना पाण्याची आवश्यकता होती ...आजच्या उत्तम पावसाने ती आवश्यकता पूर्ण केली आहे ....
भारतात रिलायन्ससोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करताना, गूगलच्या सुंदर पिचाई यांनी सांगितलं की भारतीय जनतेला आता जगातलं तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत येण्याची वाट पाहावी लागणार नाही. स्वस्तातील इंटरनेट आणि स्मार्टफोन यामुळे तंत्रज्ञान त्यांच्या हातात आल्याचं सुंदर पिचाई यांनी सांगितलं.
आजच्या एजीएममध्ये कंपनीच्या सर्व भागधारकांना माहिती देताना त्यांनी गूगलला स्ट्रटेजिक इन्व्हेस्टर म्हणून रिलायन्स समूहात आमंत्रित केलं.
नवीन गुंतवणूक दारांना आकर्षित करत कर्जमुक्त होण्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मोहीमेचा एक भाग म्हणून आजच्या एजीएममध्ये गूगलने रिलायन्स जिओमध्ये 7.7 टक्के हिस्स्यासाठी 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं सांगितलं. रिलायन्स जिओमध्ये अलीकडच्या तीनेक महिन्यात झालेल्या गुंतवणुकीमुळे रिलायन्सने दोन लाख बारा हजार 809 कोटी रुपयांचा (रु. 212809)निधी जमवला आहे.

जियो मार्केट आतापर्यंत देशभरातील 200 शहरांमध्ये पोहोचलं आहे : मुकेश अंबानी
रिलायन्, जियोच्या 43व्या एजीएम दरम्यान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचई या दोघांचे खास संदेश दाखवण्यात आले. येणाऱ्या काळात भारतात सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढणार असल्याचं दोघांनीही सांगितलं.
प्रेझेंटेशन दरम्यान किरण थॉमस यांनी सांगितले की, जियोच्या लेटेस्ट जियो ग्लास अल्ट्रा मॉडर्न टेक्नोलॉजीमार्फत यूजर्सना उत्तम रिअॅलिटी सर्विसेस देण्यात येणार आहेत. या जियो ग्लासमार्फत शिक्षण आणि विद्यार्थी वर्च्युअल रूमचा फायदा घेऊ शकणार आहेत.
जियोच्या एज्युकेशन प्लेटफॉर्ममार्फत भारतामध्ये क्वॉलिटी टिचर्सची कमतरता पूर्ण करण्याचं काम करण्यात येणार असल्याचं ईशा अंबानी यांनी सांगितलं.
दोन लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीची निर्यात करणारी कंपनी
देशात सर्वाधिक जीएसटी भरणारी कंपनी
ईशा अंबानी यांनी बोलताना सांगितलं की, रिलायन्स इंडस्ट्री आणि रिलायन्स जियोमार्फत आम्ही डिजिटल हेल्थ केअरसंदर्भात अनेक उपक्रम राबवणार आहोत. यामध्ये जियो 4जी मोबाइल नेटवर्क आणि जियो फाइबर ब्रॉडबैंड, जियोमीट प्लेटफॉर्म आणि जियो हेल्थ प्लेटफॉर्म यांचा समावेश असणार आहे.
आकाश अंबानीने एजीएममध्ये जियो टीव्ही+ सादर करत सांगितलं की, जियो टीव्ही+ मध्ये जगभरातील 12 अग्रणी ओटीटी कंपन्यांचा कन्टेंट मिळणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिज्नी प्लस हॉटस्टार, वूट, के साथ साथ जी5, सोनी लिव, जियो सिनेमा, जियो सावन आणि यूटयूब यांसारख्या कंपन्यांचा समावेश असणार आहे.
मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि किरण यांना आपल्या कंपनीच्या नवीन आणि इनोवेटिव्ह प्रोग्रामसंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावलं.
मुकेस अंबानी बोलताना म्हणाले की, त्यांना गर्व आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीवर आता कसलंही कर्ज नाही. तसेच कंपनीने मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होण्याचं जे लक्ष्य ठेवलं होतं, ते वेळे आधीच पूर्ण केलं आहे. तसेच 150 अब्ज डॉलर्स ची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील पहिली कंपनी असल्याचंही मुकेश अंबानी यांनी सांगितलं.
मुकेश अंबानी यांनी गूगलसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी करणार आहे. तसेच गूगल जियोमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, जियो भारतात वर्ल्ड क्लास 5G सेवा सुरु करणार आहे. त्याचसोबत मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, आम्ही ग्लोबली टेलिकॉम ऑपरेटर्सना 5G सॉल्यूशन देणार आहोत.
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये बोलताना सांगितले की, 'संकटाच्या वेळी अनेक मोठ्या संधी येतात. RIL चं मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेलं आहे. याचसोबत मुकेश अंबानी यांनी गूगलसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी करणार आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, 'कोरोना व्हायरस एक मोठं आव्हान बनून आला आहे. यातून भारत आणि जग लवकरच बाहेर पडणार आहे.' मुकेश अंबानी पुढे बोलताना म्हणाले की, जियो मीट आतापर्यंत 50 लाख लोकांनी डाऊनलोड केलं आहे. दरम्यान जियो मीट हे व्हिडीओ मीटिंग अॅप आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम पार पडणार आहे. ही कंपनीची 43वी एजीएम असणार आहे. वेगवेगळ्या वर्चुअल प्लेटफॉर्ममार्फत रिलायन्सचे एक लाखांहून अधिक शेअर होल्डर या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. या एजीएमसाठी कंपनीने तयारी केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच रिलायन्स एजीएम ऑनलाईन होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा एजीएम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.

पार्श्वभूमी

Reliance AGM | रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु आहे. मुकेश अंबानी यांनी या बैठकीत मोठ्या घोषणा केल्या आहेत. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं 5G तंत्रज्ञान लवकरच ट्रायल सुरु करणार असल्याचं मुकेश अंबानी यांनी या बैठकीत बोलताना सांगितलं. 


 


ही कंपनीची 43वी एजीएम असणार आहे. वेगवेगळ्या वर्चुअल प्लेटफॉर्ममार्फत रिलायन्सचे एक लाखांहून अधिक शेअर होल्डर या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. या एजीएमसाठी कंपनीने तयारी केली आहे. इतिहासात पहिल्यांदाच रिलायन्स एजीएम ऑनलाईन होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा एजीएम ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्याता आला आहे.


गूगल जियोमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार


मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये बोलताना सांगितले की, 'संकटाच्या वेळी अनेक मोठ्या संधी येतात. RIL चं मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेलं आहे. याचसोबत मुकेश अंबानी यांनी गूगलसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी करणार आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.


 


जगभरातील रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर होल्डर्सचा सहभाग


रिलायन्सची एजीएम नेहमी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत होत असते. परंतु, यावेळी कोरोना संकटामुळे शेअर होल्डर्सचं या मिटिंगमध्ये येणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे रिलायन्सने आपल्या 26 लाख शेअर होल्डर्ससाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने वर्चुअल प्लॅटफॉर्मचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे वर्चुअल प्लॅटफॉर्ममार्फत संपूर्ण जगभरात पसरलेले शेअर होल्डर्स एजीएममध्ये सहभागी होणार आहेत.


कंपनीने जारी केला व्हॉट्सअॅप चॅटबॉट


एजीएमशी निगडीत कोणतीही माहिती आणि शेयरहोल्डर्स, गुंतवणूकदार, मीडिया आणि इतर लोकांच्या मदतीसाठी रिलायन्सने व्हॉट्सअॅप चॅटबॉटही जारी केला आहे. यासाठी तुम्हाला फक्त +91 79771 11111 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून 'Hi' मेसेज करावा लागेल. त्यानंतर बॉटमार्फत तुमच्या सर्व समस्यांचं समाधान करण्यात येणार आहे. एजीएमशी निगडीत जोडलेल्या या व्हॉट्सअॅप चॅटबॉटला जियो हॅप्टिकने तयार केलं आहे. हा चॅटबॉट 24*7 काम करणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.