Kolkata Murder Case कोलकाता : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर सामुदायिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी गेले 41 दिवस संप पुकारला होता. पश्चिम बंगाल सरकार आणि आंदोलक डॉक्टरांमध्य चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. अखेर पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी संप मागं घेत अशल्याची घोषणा केली. आता डॉक्टर 21 सप्टेंबरपासून कामावर परतणार आहेत. या दरम्यान आपात्कालीन सेवा सुरु राहतील तर ओपीडी सेवा बंद राहणार आहे.
पश्चिम बंगालच्या सरकारनं आंदोलक डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यानंतर आणि दक्षिण बंगालमधील वाढत्या पूरस्थितीचा विचार करुन संप मागं घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोलकाता येथील आरोग्य मंत्रालयाच्या मुख्यालयासमोर 20 सप्टेंबरला संप जाहीरपणे मागं घेतला जाईल. डॉक्टर 20 सप्टेंबरला मोर्चा काढतील आणि दुसऱ्या दिवशी कामावर परतणार आहेत.
न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, आंदोलक डॉ. अकीब यांनी संपाच्या 41 व्या दिवशी भूमिका मांडली. पश्चिम बंगाल ज्युनिअर डॉक्टर्स फ्रंटनं आंदोलनाच्याकाळात अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. मात्र, काही गोष्टी अजूनही मिळालेल्या नाहीत. कोलकाता पोलीस कमिश्नर, डीएमई आणि डीएचएस यांना राजीनामा द्यायला प्रवृत्त केलं. मात्र, आमचं आंदोलन संपलंय असा अर्थ नाही. आम्ही नव्या पद्धतीनं आंदोलन पुढं नेणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.
मुख्य सचिवांना हटवा, संपकरी डॉक्टरांची मागणी
पश्चिम बंगालच्यावतीनं दिलेल्या निर्देशांनुसार आम्हाला बचाव आणि सुरक्षेसंदर्भातील उपाय योजना राबवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं. मुख्य सचिवांना देखील पदावरुन हटवलं जावं, अशी मागणी संपकरी डॉक्टरांनी केली. आम्ही उद्या आरोग्य भवन ते सीजीओ कॉम्प्लेक्स या दरम्यान एक रॅळी आयोजित करणार आहोत. त्यानंतर आमचं आंदोलन संपवू आणि 21 तारखेपासून काम सुरु असं आंदोलकांनी म्हटलं.काम सुरु केल्यानंतर प्रशासनावर आमचं लक्ष असणार आहे. आम्हाला काही चुकीचं वाटलं तर आणखी मजबुतीनं मैदानात उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.
ओपीडी सेवा बंद राहणार
डॉ. अकीब यानं पुढं म्हटलं की आम्ही 21 सप्टेंबरपासून कामावर परतणार आहोत. अत्यावश्यक सेवा सुरु करणार आहोत. सध्या ओपीडी, ओटी सेवा रद्द राहतील. महिला सहकाऱ्यांची सुरक्षा निश्चित केली जावी, यासाठी आंदोलन सुरु राहील, असं त्यांनी म्हटलं.
इतर बातम्या :