मुंबई: 2006 सालाच्या आधी निवृत्ती घेतलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण की, 2006 पूर्वी निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.
पेन्शनवाढीच्या याच निर्णयाप्रमाणे 33 वर्ष नोकरी केल्यास मिळणारी संपू्र्ण पेन्शन ही अटही शिथिल केली आहे. पेन्शन कल्याण विभागानं  निर्णय घेतला आहे की, 2006 पूर्वीच्या पेन्शनधारकांना समेकित पेन्शन, वेतनमान आणि ग्रेड वेतन हे 50 टक्के वेतनापेक्षा कमी असता कामा नये. जरी कर्मचाऱ्यांनी 33 वर्ष नोकरी केलेली नसली तरीही.


 

नियमाप्रमाणे, केंद्र सरकारचा एक कर्मचारी कमीत कमी 10 वर्ष सेवा केल्यानंतर पेन्शनचा हकदार बनतो. सहा एप्रिलला एक शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, "सुधारित पेन्शन थकबाकी एक जानेबारी 2006 पासून लागू होणार आहे."