चंदिगड : हरियाणा राज्यातील दोन जिल्ह्यांच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुडगावचं नाव गुरुग्राम तर मेवात जिल्ह्याचं नाव बदलून नूह ठेवण्यात येणार आहे.

 
हरियाणाला पौराणिक काळापासून विशेष महत्त्व आहे. भगवतगीता आणि हरियाणा यांचं वेगळं नातं आहे. महाभारत काळात गुरु द्रोणाचार्य याच भागात राजपुत्रांना प्रशिक्षण देत असत, त्यामुळे नावात बदल करुन गुरुग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 
गुडगावचं नाव बदलण्यासाठी दीर्घ काळापासून रहिवासी मागणी करत होते, त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं हरियाणा सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे मेवात जिल्ह्याचं नामकरणही नूह असं करण्यात आलं आहे.

आतापर्यंत भारतातील शहर/जिल्हे यांची बदललेली नावं :
बॉम्बे - मुंबई
कलकत्ता - कोलकाता
मद्रास - चेन्नई
गौहाटी - गुवाहाटी
पंजिम - पणजी
बँगलोर - बंगळुरु
त्रिवेंद्रम - तिरुअनंतपुरम
अहिल्यानगर - इंदौर
पॉन्डिचेरी - पुदुचेरी
बनारस - वाराणसी
प्रयाग - अलाहाबाद
ओडिसा- उदिशा