कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.
यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या होत्या. मात्र तांत्रिक घोळामुळे एका जागेचा निकाल रद्द करण्यात आला. पण पुन्हा त्याबाबतची खातरजमा केल्यानंतर, भाजपने जिंकलेली ही जागा त्यांच्याच पारड्यात पडली.
भाजपच्या कर्नाटकातील हुबळी-धारवाडच्या विजयी उमेदवाराचा निकाल रद्दबातल करण्यात आला होता. मतमोजणीनुसार जगदीश शेट्टार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगानं हा निकाल रद्द करत राखून ठेवला होता. अखेरी मध्यरात्री जगदीश शेट्टार यांनाच विजयी घोषित करण्यात आलं.
त्यामुळे भाजपचं संख्याबळ 104 झालं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
एकूण 222
भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार
कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी आज विधीमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत येडियुरप्पांची विधीमंडळ नेते म्हणून निवड होईल आणि त्याबाबतची माहिती राज्यपालांना दिली जाईल. म्हणजेच भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल.
मात्र भाजपकडे बहुमतासाठी 8 जागांची कमी आहे.
काँग्रेस-जेडीएस आघाडी
दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने सर्वात कमी जागा मिळालेल्या जेडीएसला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर जेडीएस नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस मिळून सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला आहे.
या दोन्ही पक्षांचे मिळून काँग्रेस 78 + जेडीएस 38 = 116 आमदार होतात.
त्यामुळे यांची संख्या भाजपपेक्षा जास्त होते.
त्यामुळे आता राज्यपाल कोणता निर्णय घेतात, याकडे अवघ्या कर्नाटकसह देशाचं लक्ष लागलं आहे.
राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष
कर्नाटकमधील सत्तासंघर्षात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांच्या अवधीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि जेडीएस यांनीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. अशा परिस्थितीत कर्नाटकचे राज्यपालच खरे किंगमेकर ठरणार आहेत.
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं भाजपनं दावा केला असला तरी, काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे कुमारस्वामीही सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. मात्र आता राज्यपाल वजूभाई वाला काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
आमचा पक्ष मोठा, आम्हाला संधी मिळावी: येडियुरप्पा
बी एस येडियुरप्पा म्हणाले, “कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आम्हाला सरकार बनवण्याची संधी मिळायला हवी. भाजप शंभर टक्के सरकार बनवेल आणि विधानसभेत बहुमतही सिद्ध करेल”
जपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांच्या अवधीची मागणी केली.
आधी सरकार बनवू, मग चर्चा : सिद्धरामय्या
दुसरीकडे कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने, कर्नाटकात पुन्हा आमचं सरकार बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“आधी आम्ही सरकार बनवू, मग आघाडीतील अटी-शर्तींची चर्चा करु. सरकार स्थापन करणं ही प्राथमिकता आहे. आमच्याकडे 2 अपक्षांसह 118 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करु”, असं सिद्धरामय्या म्हणाले.
..तर कुमारस्वामी मुख्यमंत्री
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सर्वात कमी जागा मिळालेला जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
कारण दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने थेट जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
- भाजप 104
- काँग्रेस 78
- जनता दल (सेक्युलर) 37
- बहुजन समाज पार्टी 1
- कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
- अपक्ष 1
एकूण 222