RBL Bank : आरबीएल बॅंकेच्या (RBL Bank  ) शेअरमध्ये झालेली घसरण आणि बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजीव आहूजा यांचा राजीनामा. अशा काही घडामोडींमुळे आरबीएल बॅंक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांची 10 टक्के हिस्सा विकत घेण्याची तयारी केल्याची चर्चा बॅंकिंग क्षेत्रात होत आहे. यामुळे बॅंक झुनझुनवाला आणि दमानी यांच्या ताब्यात जाणार का? याबाबत चर्चा होत आहेत. असे असताना दुसरीकडे रिझर्व बॅंकेने (Reserve Bank) परीपत्रक काढून आरबीएल बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली असल्याची माहिती दिली आहे. बॅंकेकडे चांगले भांडवल असून आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही भीती बागळण्याची गरज नाही अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. 


रिझर्व्ह बॅंकेने मागच्या आठवड्यात योगेश दयाल यांची बॅंकेच्या संचालक मंडळात अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याशिवाय सोमवारी आरबीएल बॅंकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या सर्व घडामोडींमुळे खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु, दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून खातेदारांना बॅंकेची स्थिती चांगली असल्याची माहिती देत दिलासा दिला आहे. 


रिझर्व्ह बॅंकेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आरबीएल बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. बॅंकेकडे चांगले भांडवल आहे. शिवाय 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच्या लेखापरीक्षण अहवालानुसार, बँकेने 16.33 टक्के कंफरटेबल कॅपीटल रेशो मेंटन केला आहे. शिवाय प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 76.6 टक्के आहे.  24 डिसेंबर 2021 पर्यंतच्या बँकेचा कव्हरेज रेशो  (LCR) शंभर टक्क्यांच्या तुलनेत 153 टक्के आहे. त्यामुळे ग्राकांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही अशी माहिती रिझर्व बॅंकेने दिली आहे. 


व्यवस्थापकीय संचालकंचा राजीनामा
आरबीएल बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजीव आहूजा यांनी राजीनामा दिला आहे. तर योगेश दयाल यांची बॅंकेच्या संचालक मंडळात अतिरीक्त संचालक म्हणून  योगेश दयाल यांची नियुक्ती केली आहे. दयाल हे देशातील जुने आणि अनुभवी बॅंकर आहेत. बॅंक क्षेत्रात त्यांचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. याबरोबरच योगेश दयाल सध्या रिझर्व्ह बॅंकेचे कम्युनिकेशन इंचार्जदेखील आहेत. 


महत्वाच्या बातम्या