मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 रुपयांची नवी नोट जारी केली आहे. या नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील आहेत.
500 रुपयांच्या नव्या नोटांच्या इन्सेटमध्ये इंग्लिशचं ए (A) अक्षर लिहिलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या दोन्ही नंबर पॅनलवर हे अक्षर छापलेलं आहे.
नोटांच्या छपाईचं वर्ष 2017 आहे. या नोटांचे इतर फीचर्स हे नोटाबंदीनंतर जारी केलेल्या नोटांप्रमाणेच आहेत. 8 नोव्हेंबरनंतर जारी केलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात असतील, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हॅण्डलवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. इन्सेटमध्ये A लिहिलेल्या 500 रुपयांच्या नोटा जारी, असं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
https://twitter.com/RBI/status/874517277546172417
दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 च्या नोटाबंदीनंतर भारतीय रिझर्व बँकेने 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. तेव्हा मोदी सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नव्या चलनातून रद्द केल्या होत्या.
इन्सेट लेटर 'A'
नोटांचा सीरिअल नंबर नीट पाहिल्यास सुरुवातीच्या तीन अंकांनंतर एक छोटी जागा रिकामी दिसेल, त्यानंतर सहा अंक दिसतील. जिथे रिकामी जागा आहे, त्यामध्ये एक इंग्लिश अक्षर आहे. त्याला इन्सेट लेटर म्हणतात. यापूर्वी E किंवा L ही अक्षरं असायची. आता नव्या नोटांमध्ये इन्सेट लेटर “A” लिहिलेलं असेल.