दहशतवाद्यांच्या बॅगेत दोन हजाराच्या नोटा
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 01:07 PM (IST)
श्रीनगर: नोटा बदलामुळे दहशतवाद आणि नक्षली चळवळींना मोठा फटका बसल्याची चर्चा सद्या होत आहे. मात्र आज काश्मीरात चक्क दहशतवाद्यांकडेच २ हजारांच्या नोटा आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. काश्मीरच्या बांदिपुरा भागात आज सकाळी भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यानंतर जेव्हा त्यांच्या मृतदेहांची झडती घेतली गेली, त्यावेळी त्यांच्याकडे २ हजार आणि शंभराच्या नव्या नोटा मिळून ८ हजारांची रोकड आढळली. त्यामुळे इतक्या सहज आणि शीघ्र पद्धतीनं दहशतवाद्यांच्या हाती नव्या नोटा लागल्यात कशा, हा प्रश्नच आहे. इकडे अजूनही देशताली नागरिकांच्या हातात दोन हाजाराची नोट पडलेली नाही. मात्र थेट दहशतवाद्यांपर्यंत या नोटा पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होणं साहजिकच आहे. या नोटा खऱ्या आहेत की खोट्या याबाबात मात्र तपास सुरु आहे.