वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, मोदींनी शिवसेनेला सुनावलं
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 02:11 PM (IST)

नवी दिल्ली : मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीला आलेल्या शिवसेना खासदारांना सुनावलं आहे. नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला दाखल झालं होतं. त्यावेळी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना चांगलंच फैलावर घेतलं. 'मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन, की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही. तुम्ही कितीही विरोध केलात, तरी तुम्हाला आमच्याबरोबरच यायचं आहे.' असंही मोदी म्हणाले.