मुंबई: चालू आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण आज जाहीर होणार आहे. या पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाची साऱ्यांनाच अपेक्षा आहे. या कपातीनंतर गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
‘अधिक व्याजदर हे अर्थव्यवस्थेसाठी मारक आहेत.’ असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पतधोरण पूर्वदिनी केलं. या पार्श्वभूमीवर जेटली यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन आठवड्यातच केंद्र सरकारनं पोस्टातील योजनांसह अन्य योजनांवरील बचतीवरील व्याजदर कमी केले. केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांच्या व्याज दरात मोठी कपात केल्यानं रिझर्व्ह बँकेला रेपो दरात कपात करण्यास मार्ग मोकळा केला असल्याचे मानले जात आहे.
जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केली तर कर्ज स्वस्त होणार आहे. त्यामुळे इतर बँकांना त्याचा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचविता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने 2015 वर्षात रेपो रेटमध्ये सव्वा टक्के कपात केली होती.