Rafale fighter jet pilot Flight Lieutenant Shivangi Singh : देश आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या शक्ती आणि संस्कृतीची भव्य परेड आयोजित करण्यात आली होती.  यावेळी हवाई दलाच्या चित्ररथाने विशेष लक्ष वेधलं होतं. राफेल लढाऊ विमान चालवू शकणारी देशातील पहिली महिला फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग, भारतीय हवाई दलाच्या चित्ररथावर उपस्थित होत्या. यावेळी हवाई दलाचा  वाद्यवृंद आणि कवायत करणारी तुकडी यांचे राजपथावरून मार्गक्रमण केलं. राफेल लढाऊ विमान चालवणाऱ्या देशातील पहिली महिला फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांच्याकडे हवाई दलाच्या चित्ररथाचं नेतृत्व होतं. जगातील सर्वोत्तम श्रेणीच्या लढाऊ विमानांपैंकी एक असलेल्या 'राफेल'ची पहिली महिला फायटर पायलट बनण्याचा मान शिवांगी सिंह यांना मिळाला आहे. राफेल वायुसेनेतील 'मिग 21 बायसन'ची जागा घेताच शिवांगीही आपल्या नव्या भूमिकेत दाखल झाल्या आहेत. 






कोण आहेत शिवांगी सिंग ?
देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग मिळाली आहे. त्या राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात. शिवांगी सिंह या उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मूळ रहिवासी आहेत. शिवांगी यांनी बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीमधून (BHU) आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिवांगी या बीएचयूमध्ये नॅशनल कॅडेट कोरमध्ये 7 एअर स्क्वाड्रनचा भाग होत्या. बीएचयूमध्ये 2013 ते 2015 पर्यंत त्या एनसीसी कॅडेट होत्या. तसंच 2013 मध्ये दिल्लीत स्वातंत्र्यदिनी परेडमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं होतं. 


आजोबांकडून प्रेरणा - 
शिवांगी सिंह यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली, जे सैन्यात कर्नल होते. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह आधी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केलं होतं.  


महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅचमधील - 
फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅचमधील आहे, ज्याचं कमिशनिंग 2017 झालं. भारतील हवाई दलाच 10 महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमानं उडवण्याचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. एका पायलटच्या ट्रेनिंगवर जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च येतो.


अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत उड्डाणाचा अनुभव - 
फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह याअगोदर राजस्थानच्या फॉरवर्ड फायटर बेसवर तैनात होत्या. इथं त्यांनी अनेकदा विंग कमांडर अभिनंदर वर्धमान यांच्यासोबत उड्डाण घेतलं होतं.