राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली दिल्ली पोलिस सतर्क झाली आहे. विध्वंसक शक्तींना लपण्याची संधी मिळू नये म्हणून पोलिसांनी आजपासून नवी दिल्ली, मध्य दिल्ली आणि उत्तर दिल्लीची बहुमजली खासगी आणि सरकारी इमारती रिकाम्या करून सील करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची सुरक्षा संवेदनशील असल्याने पोलीसांचे विशेष सेल आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या माहितीनुसार, "यावेळी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 48 केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. त्यासाठी संबंधित विभागांकडून लेखी मान्यताही मिळाली आहे, तर दिल्ली पोलिसांचे 22 हजार कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. प्रजासत्ताक दिवस परेडवेळी संवेदनशील ठिकाणं आणि इमारतींच्या बाहेर ब्लॅक कमांडो तैनात करण्यात येणार आहे. परेडनंतर राष्ट्रपती भवनात होणाऱ्या 'एटहोम'पर्यंत सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमाभागात सुरक्षेसाठी संबंधीत राज्याच्या पोलीसांसोबत रणनीती आखण्यात आली आहे.
आपातकालीन परिस्थितीत चालत्या फिरत्या मोबाईल कंट्रोल रूम बनवण्यात आल्या आहेत. या खास प्रकारच्या मोबाईल कंट्रोल रुममध्ये इंटेलिजेंस कॉल-सिग्नल्सही निश्चित करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत फक्त दिल्ली पोलीसांना या गोष्टी समजतील. परेड दरम्यान गर्दी थांबविण्याचीही काळजी घेतली जाईल. यासाठी दिल्ली वाहतूक पोलिसांचे 2000 हून अधिक जवान रस्त्यावर तैनात असतील.
National Bravery Award | महाराष्ट्रातील दोन मुलांचा बाल शौर्य पुरस्काराने सन्मान | ABP Majha