नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून एकूण 128 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तसेच जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. तसेच राधेशाम खेमका आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आहे.
पद्म पुरस्कार जाहीर
पद्मविभूषण
- प्रभा अत्रे
- राधेशाम खेमका (मरणोत्तर)
- बिपीन रावत (मरणोत्तर)
- कल्याण सिंग (मरणोत्तर)
पद्मभूषण
- सायरस पुनावाला
- नटराजन चंद्रशेखरन
पद्मश्री
- विजयकुमार डोंगरे
- डॉ. हिम्मतराव बावस्कर
- सुलोचना चव्हाण
- सोनू निगम
- अनिल राजवंशी
- बालाजी तांबे (मरणोत्तर)
- भिमसेन सिंगल
चार भारतीय वंशाच्या व्यक्तींना पुरस्कार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला आणि गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्याचसोबत ब्रिटनचे नागरिक परंतु भारतीय वंशाच्या डॉ. प्रोकर दासगुप्ता आणि आयर्लंडच्या रुतगेर कॉर्टनहस्ट यांचाही पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो.
संबंधित बातमी :