नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून जगभरातील देश कोरोना महामारीशी लढा देत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक मेहनत घेत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं? अन् काय नाही? याचे सल्ले देत आहेत. अलीकडेच फ्रंटियर्स इन न्यूट्रीशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, आठवड्याला 5 ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक रेड वाईनचं सेवन करणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका 17 टक्क्यांनी कमी होतो असा दावा करण्यात आला आहे.


ब्रिटीश वेबसाइट मिररने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या शेनझेन कांगनिंग रूग्णालयात ब्रिटीश नागरिकांचा डेटा अभ्यासून यावर रिसर्च तयार केला आहे. यात वैज्ञानिकांनी ब्रिटनच्या लोकांची दारु पिण्याची सवय आणि कोरोना हिस्ट्री याचा अभ्यास केला. रेड वाईनमध्ये पॉलीफेनोल नावाचं एक कपाउंड असतं जे फ्ल्यू आणि दुसऱ्या श्वास घेण्याच्या आजारापासून दूर ठेवण्यात मदत करतं. त्यामुळे या ड्रिंकचं सेवन करण्याने कोरोना संक्रमण होण्याचा धोका कमी होतो असं सांगण्यात आलंय. 


व्हाईट वाईन आणि शॅम्पेनही प्रभावी


वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, व्हाईट वाईन आणि शॅम्पेनसारखे ड्रिंक्सही कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करतात. जे लोक आठवड्यातून 1 ते 4 ग्लास व्हाईट वाईन किंवा शॅम्पेन पितात त्यांना कोरोना संक्रमणाचा धोका 8 टक्क्यांनी कमी होतो.


कोरोनामध्ये बिअर आणि साइडर पिणं धोक्याचं  


अहवालानुसार, बिअर आणि साइडर पिणाऱ्या लोकांना कोरोना होण्याचा धोका जवळपास 28 टक्के जास्त असतो. जर तुम्ही या ड्रिंक्सचं सेवन आठवड्यातून 5 ग्लास किंवा त्यापेक्षा अधिक करत असाल तर सावध राहा. जे लोकं यापेक्षा अधिक बिअर आणि साइडरचं सेवन करतात त्यांना कोरोना व्हायरसचा धोका इतर लोकांपेक्षा जास्त असतो. त्यासाठी वैज्ञानिक जास्त दारु पिण्याचा सल्ला देत नाहीत.


कोरोनापासून वाचण्याासठी एकमेव पर्याय लसीकरण


कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे लसीकरण. सध्या भारतात 15 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे. त्यासोबत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांना बूस्टर डोस अभियानाची सुरुवात 10 जानेवारीपासून सुरु झाली आहे.


दरम्यान, देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात सलग 5 व्या दिवशी ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी 3 लाख 6 हजार 64 नवे कोरोना रुग्ण सापडले. तर 439 रुग्णांचा मृत्यू झाला. 


महत्वाच्या बातम्या