Olympic and Paralympic Heroes : टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंनी 26 जानेवारीपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (IISM) चा हा उपक्रम आहे, ज्यामध्ये या सर्व खेळाडू आणि पॅराऍथलीट्ससह एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये या सर्व खेळाडूंच्या कामगिरीनंतर भारताचे राष्ट्रगीत दाखवण्यात आले आहे. IISM ने 26 जानेवारीपूर्वी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्रगीताचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोकांमध्ये खेळाविषयी जागरुकता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.
या खेळाडूंनी गायले राष्ट्रगीत
नीरज चोप्रा, रवी कुमार दहिया, मीराबाई चानू, पीआर श्रीजेश, लवलिना बोरोघन, सुमीत अंतील, मनीष नरवाल, प्रमोद भगत, कृष्णा नगर, भावना पटेल, निषाद कुमार, योगेश कथुनिया, देवेंद्र झाझरिया, प्रवीण कुमार या खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले. सुहास यथीराज, शरद कुमार, हरविंदर सिंग आणि मनोक सरकार यांनीही राष्ट्रगीत गायले आहे. या सर्वांनी टोकियो येथे झालेल्या या खेळांमध्ये भारताचे नावे ऐतिहासिक कामगिरी केली.
पाहा व्हिडीओ -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने यासंबंधित प्रतिक्रिया देत सांगितले की, "सैनिक या नात्याने जेव्हा तुम्ही परदेशी भूमीवर आमचे राष्ट्रगीत ऐकता तेव्हा ही अभिमानाची गोष्ट असते. लोकही आम्हांला आदर देतात. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे." राष्ट्रगीताचा हा व्हिडिओही नीरजने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. IISM ने 2016 मध्येही एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सानिया मिर्झा, महेश भूपती यांच्यासह अनेक खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- UAE Missile Attack : यूएईने अबू धाबीवरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा डाव उधळला; हल्लेखोरांना इशारा
- Joe Biden : 'या' प्रश्नावर बिथरले राष्ट्राध्यक्ष बायडेन, माइकवरच पत्रकाराला हासडली शिवी
- Omicron : चिंताजनक! आयसीयूमधील रुग्णांची संख्या वाढतीच, ओमायक्रॉनला हलक्यात घेण्याची चूक पडू शकते भारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha