नवी दिल्ली : शहीद लान्सनायक नजीर अहमद वानी यांना आज देशाचा सर्वोच्च वीरता पुरस्कार अर्थात अशोकचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नजीर वानी यांच्या पत्नी आणि आईने हा मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार स्वीकारला.


नजीर वानी यांचे वैशिष्ट्य म्हणजे सैन्यात येण्याआधी हे अतिरेकी होते. त्यांचा काही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागही होता. पण 2004 साली वानी दहशतवादाला तिलांजली देऊन सैन्यात दाखल झाले.

सैन्यातील शौर्याबद्दल त्यांचा 2007 आणि 2017 सालीही गौरव करण्यात आल होता. पण 23 नोव्हेंबर 2018 ला शोपियातल्या दहशतवादांविरुद्धच्या लढाईत वानी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला.