नवी दिल्ली: देशभरात 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दिल्लीतील राजपथावर दिमाखदार संचलन झालं. यावेळी देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केलं.
आसियान अर्थात असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स या आग्नेय आशियातील 10 देशांचे प्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशाचे प्रमुख आज उपस्थित आहेत. यांच्यासमोर भारत राजपथावर आपली ताकद दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते.
दुचाकीवर चित्तथरारक कसरती सादर केल्या. नौदलातील स्वदेशी बनवटीची ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती, ऑल इंडिया रेडिओ, आयकर विभागाचे चित्ररथही यात सहभागी झाले.
यानंतर विविध राज्यांचे चित्ररथ राजपथावर दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशाचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याचा चित्ररथ महाराष्ट्राने राजपथावर उतरवला. यावेळी उपस्थित असलेल्या खासदार संभाजीराजे भोसले यांनी उभं राहून जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या.