नवी दिल्ली : जागतिक स्तरावरील प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षण सुधारक, प्राध्यापक यश पाल यांचं निधन झालं. सोमवारी रात्री वयाच्या 90 व्या वर्षी नोएडामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
1976 साली त्यांना पद्मभूषण, तर 2013 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं.
यश पाल यांचा जन्म 1926 साली ब्रिटीशकालीन भारतातील झांग जिल्ह्यात (सध्या पाकिस्तानात) झाला होता.
पाच वर्षांपूर्वी यश पाल यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता, मात्र त्याविरुद्ध त्यांनी यशस्वी लढा दिला.
मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. पीएचडीसाठी यश पाल यांनी मॅसेच्युसेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला होता. भारतात परतल्यावर ते 1983 पर्यंत टाटा इन्स्टिट्यूटमध्येच होते.
अनेक शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांच्या सुधारणा समितींवर सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. विज्ञानाच्या प्रसारासाठी 2009 मध्ये त्यांना 'युनेस्को'तर्फे कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षण सुधारक यश पाल यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2017 11:03 AM (IST)
पद्मविभूषणने सन्मानित भारतीय शास्त्रज्ञ प्रा. यश पाल यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -