नवी दिल्ली: नोकरीच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला चाप बसावा यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयानं ‘शी-बॉक्स’ हे नवं वेब पोर्टल सुरू केलं आहे. या वेबपोर्टलवरुन महिलांना थेट तक्रार करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्यांना या वेबसाइटच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहेत. तसेच नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचं प्रमाणही तपासणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितलं.
या पोर्टलची सुरुवात सध्या केंद्रीय कर्मचारी महिलांसाठी सुरु झाली असली तरी लवकरच याचा विस्तार करण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी देखील ही सेवा सुरु केली जाईल. असं मनेका गांधी म्हणाल्या.
नोकरीत महिलांचं लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्याला चाप बसावा यासाठी हे वेब पोर्टल सुरु करण्यात आलं आहे. केंद्र सरकारमध्ये सध्या 3.37 लाख महिला कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ही वेबसाईट नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी 'शी बॉक्स', केंद्राचं नवं वेब पोर्टल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2017 07:59 AM (IST)
नोकरीच्या ठिकाणी अनेकदा महिलांचा लैंगिक छळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी 'शी बॉक्स' हे वेब पोर्टल सुरु केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -