केरळ : धार्मिक प्रथांचं कारण देत एका व्यक्तीने पत्नीला नवजात बाळाला स्तनपान करण्यास रोखलं. धक्कादायक म्हणजे डॉक्टर आणि पोलिसांनी त्याला समजावू लागल्यानंतर त्याने ओली बाळंतीण पत्नी आणि नवजात बाळासह रुग्णालयातून पळ काढला. केरळच्या कोळीकोडीमध्ये ही घटना घडली.

अबू बकर सिद्धीकी असं त्या वक्तीचं नाव आहे. धार्मिक प्रथेमुळे त्याने त्याच्या नवजात बाळाला सुमारे 24 तास आईचं दूध पिऊ दिलं नाही. मशिदीतून येणारा अजानचा आवाज बाळाने ऐकल्यानंतरच नवजात बाळाला दूध पिण्यास देईल. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये सगळेच आवाक् झाले होते.

बरं हा ड्रामा इथेच थांबला नाही, बाळाला दूध पिऊ न देणं म्हणजे त्याचा जीव धोक्यात टाकणं, असं सांगत पोलिस आणि डॉक्टरही त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्याने बाळ आणि पत्नीला घेऊन रुग्णालयातून पळ काढला. ते तिघे आता कुठे आहे, हे अजूनही समजू शकलेलं नाही.

अबू बकरने 24 तास बाळाला दूध न पाजण्याचं म्हटलं होतं. तसंच अजानची वाट पाहिन, असंही त्याने म्हटल्याचा दावा डॉक्टरांनी केला

अबू बकर सिद्धीकीची पत्नी हफसाथने 2 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी मुक्काम परिसरातील एका रुग्णालयात मुलाचा जन्म दिला होता. त्यानंतर रग्णालयातील अधिकाऱ्यांनी बाळाला दूध पाजणयास सांगितलं. पण अबू बकरने तिला रोखलं.

बाळाला गुरुवारी दुपारी म्हणजे सुमारे 24 तासांनंतर बाळाला दूध पाजण्यात आलं. दूध पाजलं नाही तर बाळाला अनेक आजार होतात, असं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो ऐकला नाही. उलट सांगितलं की, मी माझ्या मोठ्या मुलालाही अशाच प्रकारे दूध पाजलं होतं, त्याला काहीच झालं नाही.

दर दोन तासाला नवजात बाळासाठी आईचं दूध आवश्यक आहे, असं डॉक्टर सांगतात. पण अबू बकरला त्याच्या  मुलाच्या जीवापेक्षा धार्मिक प्रथा अधिक महत्त्वाच्या वाटल्या. डॉक्टरांच्या समजावण्यानंतरही तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता.

याचवेळी कोळीकोडचे जिल्हाधिकारी प्रशांत नायर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे अबू बकरविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोणताही धर्म नवजात बाळाला उपाशी ठेवण्याचं शिकवत नाही, अस, प्रशांत नायर म्हणले. यावरुन अबू बकरची क्रूर मानसिकता कळते.

अखेर वैतागलेल्या हॉस्पिटल प्रशासनाने, कोणत्याही परिस्थितीत याची जबाबदारी घेणार नाही, असं अबू बकरकडून लिहून घेतलं. आता पोलिस या संपूर्ण प्रकाराची चौकशी करत असून जिल्हा प्रशासनही या प्रकरणात कठोर पावलं उचलणार आहे.