मिका सिंहच्या बचावासाठी एक्स गर्लफ्रेंड राखी सावंत मैदानात
मी लवकरच पॉर्नस्टार बनणार आहे : राखी सावंत 'मोदीजी सीलिंग फॅन बॅन करा', प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीची मागणी! सनी लिऑनच्या 'त्या' मुलाखतीची चर्चा सनी लिऑनसोबत काम करायला आवडेल : आमीर खानपंतप्रधानांचा अपमान, राखी सावंतवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2016 03:24 PM (IST)
जयपूर: अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याचा आरोप आहे. राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस घातला होता. त्यामुळे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील कांकरोली पोलिसात पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाच्या आदेशनंतर कांकरोली पोलिसांनी ही कारवाई केली. PHOTO: ड्रेसवर मोदी, राखी सावंतवर गुन्हा राखीने काळ्या रंगाच्या ड्रेसवर मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करुन, आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. याप्रकरणी राखीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याचं म्हणणं मान्य करत, पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राखी सावंतवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 292,293,294, 501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित बातम्या