नवी दिल्ली : मोबाईल नेटवर्क कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसत आहे. जिओ कंपनी ऑफलाइन डोमेस्टिक कॉल फ्री करणार आहे. एक जानेवारीपासून सर्व जिओ कॉल विनामूल्य होतील असे कंपनीने एक निवेदन जारी करत सांगितले आहे. 1 जानेवारीपासून इंटरकनेक्ट वापर शुल्क (IUC) आकारले जाणार नाही. कंपनी म्हणाली, "आमच्या वचनाचा सन्मान करत आम्ही हा निर्णय घेतला आहे. जिओ पुन्हा एकदा 1 जानेवारी 2021 पासून सर्व ऑफलाइन कॉल फ्री करत आहे."


यासह कंपनीने हे स्पष्ट केले की Jio नेटवर्क ऑफलाइन कॉल नेहमीच विनामूल्य होता. कंपनीच्या या निर्णयानंतर 1 जानेवारीपासून रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना व्हॉईस कॉलसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. आतापर्यंत कंपनी इंटरकनेक्ट यूज चार्ज (आययूसी) आकारत होती.


याद्वारे कंपनीने ग्राहकांना असे आश्वासन दिले आहे की जर त्यांच्याकडे नियामक वतीने शुल्क आकारले गेले तरच ते शुल्क आकारतील. रिलायन्स जिओच्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. या घोषणेसह जिओची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी भारती एअरटेलचे शेअर्स दोन टक्क्यांनी खाली गेले.



सप्टेंबर 2019 मध्ये टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायच्या निर्णयाच्या नंतर जिओने आपल्या ग्राहकांकडून इंटरकनेक्ट यूज चार्ज (आययूसी) गोळा करण्यास सुरवात केली. खरं तर, ट्रायने आययूसीसाठी जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत वाढविली होती. परंतु त्यावेळी कंपनीने म्हटले होते की जर नियामकाने हा शुल्क घेतला नाही तर ती ग्राहकांकडून शुल्क आकारणार नाही.


संबंधित बातम्या :
उद्यापासून 'या' मोबाईलमधील WhatsApp होणार बंद!


इन्स्टाग्रामवर सुरुये "कॉपीराइट फिशिंग स्कॅम''; सावध व्हा नाहीतर....


जाणून घ्या, Google ला कशी सापडतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं