नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या गर्तेत सापडलेल्या अनिल अंबानींना त्यांचे बंधू मुकेश अंबानींनी मदतीचा हात पुढे केला आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने रिलायन्स कम्यूनिकेशन (आरकॉम)चे स्पेक्ट्रम, मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कसह इतर मोबाईल उद्योगांची खरेदी केली आहे. यामुळे दिवाळखोरीकडे झुकलेल्या अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळाला आहे.


सध्या आरकॉमवर तब्बल 45 हजार कोटीचं कर्ज आहे. हे चुकवण्यासाठी अनिल अंबानींची जीवतोड मेहनत करत आहेत. हे कर्ज चुकवण्यासाठी चीनच्या एका बँकेने कंपनीला नॅशनल नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT)मध्ये खेचले होते.

त्यामुळे कंपनीला टाळे लागण्याची शक्यता होती. त्यातच आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने अनिल अंबानींना मदतीचा हात पुढे केला आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, आरकॉमसोबतच्या करारान्वये कंपनीच्या यूनिटमधून चार श्रेणीतील टॉवर, ऑप्टिकल फायबर केबलचं नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि मीडिया कनवर्जेंस नोड्स (एसीएन) संपत्तीची खरेदी करणार आहे.

वास्तविक, जिओने ही सर्व संपत्ती भविष्यातील रणनितीसाठी अतिशय पूरक असल्याने खरेदी केल्याचं बोललं जात आहे. कारण, याद्वारे रिलायन्स जिओ आपल्या ‘फायबर टू होम’ आणि इतर सेवा सुरु करण्याची शक्यता आहे.

सध्या या व्यवहाराबाबत सरकार आणि रेग्यूलेटरी अथोरिटीकडून मंजुरी घेणे बाकी आहे. पण ही सर्व प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या एका स्वतंत्र समूहाच्या देखरेखीखाली संपन्न झाली. तसेच, दोनवेळच्या निविदा प्रक्रियेतही जिओने चांगली बोली लावून, या निविदा आपल्या नावावर मंजूर करुन घेतल्या.

दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आरकॉमने आपल्या देणेकऱ्यांना एका नव्या व्यवहाराला अंतिम रुप देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची घोषणा मंगळवारी केली होती. या व्यवहारातून आरकॉमची संपत्ती विकून कंपनी 40 हजार कोटी रुपये जमा करेल.

कंपनीच्या या व्यवहाराला चिनी बँकेचीही सहमती आहे. ज्या बँकेने कंपनीला 1.80 लाख अब्ज डॉलरचं कर्ज चुकत करण्यास अपयश आल्याने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT)मध्ये खेचले होते.

संबंधित बातम्या

रिलायन्सचा 13 हजार 251 कोटींचा विद्युत व्यवसाय अदानींकडे

अनिल अंबानींच्या आरकॉम विरोधात दिवाळखोरीची याचिका