नवी दिल्ली : तिहेरी तलाक संदर्भातील विधेयक अखेर लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. एमआयएमने या विधेयकासंदर्भात दिलेल्या काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. पण त्या सर्व फेटाळण्यात आल्या असून, विधेयक मंजूर करण्यात आलं. तिहेरी तलाक संदर्भातील विधेय आज लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता. तर एमआयएमसह अनेक मुस्लीम संघटनांनी याला विरोध दर्शवला होता. या विधेयकात एमआयएमचे खासराद असद्दुदीन ओवेसी यांनी काही दुरुस्त्यात सुचवल्या होत्या. यावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. पण त्या विरोधात बहुतांश खासदारांनी मतदान केल्याने, ओवेसींनी सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या.