मुंबई : आरबीआय लवकरच शंभर रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. शंभर रुपयांच्या नव्या नोटेवर दोन्ही नंबरिंग पॅनलवर चौकटीतील अक्षरं नसतील. महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या शंभरच्या नोटाही चलनात कायम राहणार आहेत.

काहीच दिवसांपूर्वी आरबीआयने वीस आणि पन्नास रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती. नव्या नोटांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जुन्या 20, 50 च्या नोटादेखील चलनात राहतील असं आरबीआयने स्पष्ट केलं होतं.वीस रुपयांच्या नवीन नोटेवर दोन्ही बाजूंनी 'L' अक्षर असेल, तर पन्नास रुपयांच्या नव्या नोटेवर कुठलंही अक्षर नसेल.

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. आता वीस, पन्नास आणि शंभरच्या जुन्या नोटाही चलनात राहणार असल्यामुळे नागरिकांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही, असं आरबीआयने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :


लवकरच नव्या 20, 50 च्या नोटा चलनात आणणार : आरबीआय