मुंबई : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कारण आता 100 मीटर पर्यंतचाच परिसर इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं काढला आहे.


यामुळे मुलुंड,ठाणे,बोरिवली,कांदिवली,गोरेगाव परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने 2015 मध्ये संजय गांधी नॅशनल पार्कच्या सीमेपासून 10 किमी परिसर इकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर केला होता. त्यामुळे या भागात खाणकाम, कुठल्याही प्रकराच्या औद्योगिक आणि व्यायसायिक घडामोडींना परवानगी दिली जात नव्हती.

याशिवाय कोणताही रहिवाशी प्रकल्प बांधण्यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक होतं.

मात्र सोमवारी रात्री केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं संजय गांधी नॅशनल पार्कच्या सीमेपासून 100 मीटर ते 4 किलोमीटरपर्यंतचा भाग इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केल्यानं अनेक नागरिकांसह, मोठ्या बिल्डर्सनाही दिलासा मिळाला आहे.

संजय गांधी नॅशनल पार्कचा एकूण एरिया जवळपास 104 स्क्वे.किमीचा आहे.