नवी दिल्ली : नोटांबदी सुरु असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार असल्याची घोषणा केली आहे. 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांनंतर आता 50 रुपयांच्या नव्या नोटा जारी होणार आहेत. https://twitter.com/RBI/status/810840193167020032 पण 50 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात कायम राहतील. 50 रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन हे महात्मा गांधी सीरिज-2005 च्या नोटांसारखंच असेल. पण यावरील नंबर नव्या पद्धतीने छापले जातील, असं रिझर्व्ह बँकेने सांगितलं.
कशी असेल 50 रुपयांची नवी नोट? 50 रुपयांच्या नव्या नोटवरील नंबर पॅनलवर इन्सेट लेटर R असेल. तसंच नंबर आकार चढत्या क्रमानुसार वाढत जाईल. म्हणजेच पहिला अंक लहान, त्यानंतरचे अंक मोठे होत जातील. या नव्या नोटांवर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसंच नव्या नोटांवर 2016 हे प्रिटिंग वर्ष छापलेलं असेल. दरम्यान 50 रुपयांच्या नव्या नोटांच्या रंगात कोणताही बदल केलेला नाही.