नवी दिल्ली: जुन्या नोट्या भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना आरबीआयनं आणखी एक नवा फतवा काढला आहे. तुमच्याकडे जुन्या नोटा असतील, तर त्या आता एकाचवेळी बँकेत भराव्या लागणार आहेत. जर तुम्ही जुन्या नोटा टप्प्या-टप्प्यानं भरत असाल तर त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय.

कारण आता जुन्या नोटा जवळपास व्यवहारातून बाद झाल्या आहेत. मात्र काही लोकं जुन्या नोटा जमा करण्यासाठी दररोज बॅँकांमध्ये जात आहेत. त्यामुळे संशय निर्माण झाला असल्याचं जेटली म्हणाले.

त्यामुळे तुमच्याकडे जर जुन्या नोटा शिल्लक असेल तर 30 डिसेंबरपर्यंत एकाचवेळी बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. रिझर्व बँकेनेही यासंबंधी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली असून, ज्यांच्याकडे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी त्या बँकांमध्ये भरण्याची 30 तारखेपर्यंतची शेवटची संधी दिली आहे.

व्हिडीओ पाहा