... म्हणून 500 आणि 1000च्या नोटा पारखून घ्या, रिझर्व्ह बँकेचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम | 27 Oct 2016 10:15 AM (IST)
मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेला सध्या बनावट नोटांची वाळवी लागली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेही 1000 आणि 500च्या नोटा पारखून घेण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ''काही समाजकंटक दैनंदिन व्यवहारामध्ये बनावट नोटांचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करत आहेत. यासाठी 1000 आणि 500च्या नोटांची योग्य पारख करुनच त्या स्विकाराव्यात.'' 1000 आणि 500च्या नोटा अशा तपासून घ्या! नुकतेच दिल्लीमधून 10 रुपयांची बनावट नाणी बनवणाऱ्या टाकसाळीवर छापा टाकून जवळपास 800 रुपयांची बनावट नाणी जप्त केली होती. त्यामुळे 10 रुपयांच्या बनावट नाण्यांची गंभीर दखल घेऊन, 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. दहा रुपयाचं नाणं खरं की खोटं, कसं ओळखायचं? या पार्श्वभूमीवर 500 आणि 1000च्या नोटाही नीट पारखून घेण्याच्या सुचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत.