हेडलाईन्स
अहमदनगर : पाथर्डी पोलिस मारहाण प्रकरण : 10 आरोपींना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
-------------
गुजरात : कच्छमध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, अपघातात 17 जवान जखमी
-------------
नवी मुंबई : अविश्वास ठरावामुळे तुम्हाला पालिकेत येणाचा अधिकार नाही, कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नका, महापौर सोनवणे तुकाराम मुंढेना पत्र देणार
-------------
जम्मू काश्मीर : आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद
-------------
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी पोलिसांच्या ताब्यात, भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रं जप्त
-------------
नवी मुंबई: चौथ्या दिवशीही सफाई कर्मचारी संपावर, मात्र, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जमा झालेला कचरा कामगार उचलणार
-------------
नवी मुंबई : आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल, मात्र कोणीही नगरसेवक उपस्थित नाही
-------------
मुंबई : सायरस मिस्त्रींच्या पत्रानंतर टाटा समूहाच्या शेअर्समध्ये 3 ते 5 टक्क्यांनी घसरण, शेअर बाजारही कोलमडला
-------------
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच, जम्मूच्या आरएसपुरा, अरनियामध्ये रात्री दोन वाजल्यापासून पाककडून गोळीबार, आरएसपुरामध्ये 5 जण जखमी
-------------
1. सीरियामध्ये इदलिब प्रांतातील शाळेवर हवाई हल्ला, 22 मुलं आणि 6 शिक्षकांचा मृत्यू, हल्ला कोणी केला याबाबत मात्र साशंकता
-------------
2. तुकाराम मुंढे प्रकरणी 'सामना'मधून थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, सरकारने बहुमताचा आदर करण्याचा सल्ला, तर मुंढेंची तात्काळ बदली होणार नाही, सूत्रांची माहिती
-------------
3. पाथर्डी पोलीस मारहाणप्रकरणी भाजपच्या 10 कार्यकर्त्यांना अटक, तब्बल 3 दिवसानंतर बीड जिल्ह्यातून कारवाई, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे कॅमेऱ्यात
-------------
4. रियाज भाटीला राष्ट्रवादीत घेतल्याबद्दल जाहीर माफी मागतो, भाटीच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीची माफी, दाऊदशी संबंध असल्यावर मात्र ठाम
-------------
5. टाटा समूहाला 1 लाख 18 हजार कोटींवर पाणी सोडावं लागेल, सायरस मिस्त्रींच्या कथित पत्रात भाकीत, बाजू मांडू दिली नसल्याचाही दावा
-------------
6. शरद पवार मुख्यमंत्री झाले पण आरटीओ कार्यालय मी आणलं, अकलूजमध्ये बोलताना अजित पवार घसरले, शाब्दिक कोटी करुन सारसासारवीचा प्रयत्न
-------------
7. प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात, पुण्यातील शनिवारवाडा शेकडो दिव्यांनी उजळला, बाजारातही लगबग
-------------
8. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या रांचीत टीम इंडियाला पराभवाचा धक्का, चौथी वन डे जिंकून न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी
-------------
एबीपी माझा वेब टीम